युपीमध्ये बुआ- भतिजाची महाआघाडी? काँग्रेसला धक्का

लखनऊ : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाश्री प्राप्त केल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असला तरी उत्तर प्रदेशातून काँग्रेसला दुःखद बातमी येण्याची शक्यता आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपा एकत्र येणार असून लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला सुद्धा या महाआघाडीत स्थान मिळणार आहे असं वृत्त आहे.
तर काँग्रेससाठी केवळ रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातून महाघाडीचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. परंतु, तीन राज्यांमधील विजयानंतर सुद्धा महाआघाडीच्या काँग्रेसला स्थान न मिळाल्याने हा काँग्रेस सोबत राहुल गांधी यांना सुद्धा जोरदार धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.
दैनिक जागरण ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार युपी’मध्ये बसपा, सपा आणि आरजेडी’ने महाआघाडी करण्याचा निर्णय निश्चित केला आहे. या ३ पक्षांदरम्यान जागावाटप सुद्धा निश्चित झाल्याचे समजते. त्यानुसार मायावतींच्या बसपा ३८, समाजवादी पक्ष ३७ आणि आरजेडी ३ असं जागा वाटप निश्चित झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु यावर अद्याप बसपा, सपा किंवा काँग्रेस नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्रसार माध्यमांकडे आलेली नाही. दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करायचा असेल तर यूपीचं राजकारण महत्वाचं ठरतं आणि त्याच कारण म्हणजे तिथे असलेल्या तब्बल ८० लोकसभेच्या जागा हेच कारण आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं