गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज एनसीपी’त जाहीर प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात राहिलेल्या वाघेला यांनी आता एनसीपी’सोबत पुढचा राजकीय प्रवास सुरु करण्याची तयारी केली आहे. गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी तशी अधिकृत माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
मागील काही दिवसांपासून ते एनसीपी’मध्ये प्रवेश करणार असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अखेर आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळणार असून ते एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदाबादमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी वाघेला यांच्या पक्षप्रवेशाबाबत मुंबईत घोषणा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु गुजरात हेच त्यांचं राजकीय कार्यक्षेत्र असल्याने अहमदाबादला हा कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं