सावधान! मोदींच्या गुजरातमध्येच भाजप पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?

गुजरात : गुजरात’मध्ये लवकरच भाजपमध्ये बंड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोदी आणि अमित शहांना गुजरातमधूनच मोठा राजकीय धक्का बसण्याची स्थित निर्माण झाली आहे असं राजकीय वातावरण आहे. कारण भाजपचे तब्बल २३ आमदार बंडाच्या पवित्र्यात असल्याचे वृत्त आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरोधात पक्षाचे तीन आमदार प्रचंड नाराज असून आपल्याबरोबर आणखी २० आमदार सुद्धा मुख्यमंत्र्यांवर प्रचंड नाराज असून ते आमच्या सोबत असल्याचा दावा त्या ३ वरिष्ठ आमदारांनी केला आहे. विशेष म्हणजे त्या ३ नाराज आमदारांनी थेट पत्रकार परिषद आयोजित करून उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि ती पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी दीर्घवेळ गुप्त बैठक सुद्धा घेतली होती असं समजतं.
गुजरातमधील वाघोडीया मतदारसंघाचे आमदार मधू श्रीवास्तव, सावलीचे आमदार केतन इमानदार व मांजलपूरचे आमदार योगेश पटेल हे पक्ष नैतृत्वावर नाराज असून त्यांनी तशी नाराजी उघडपणे पत्रकार परिषदेत व्यक्त केल्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आम्हची आमचे प्रश्न घेऊन दिल्लीला सुद्धा जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एकूणच हे नाराज आमदार मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरोधात उघड बंड करत असून ते नरेंद्र मोदी आणि अमित शहांना सुद्धा धक्का देऊ शकतात.
आम्ही जनतेचे प्रतिनिधी असून राज्यातील नैतृत्व आम्हाला महत्व देत नाही तसेच आमचं सरकार असून सुद्धा प्रशासकीय अधिकारी आम्हाला बराच वेळ भेट देत नाहीत आणि ताटकळत ठेवणं हे रोजच झालं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे परदेश दौऱ्यावर असताना आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने सर्व काही आलबेल नाही असच म्हणावं लागेल अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं