समाज माध्यमांवर एकच हशा! बंद सेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेरच पडले नसते

मुंबई : आज इंधन दरवाढी विरोधातील काँग्रेसच्या भारत बंद आंदोलना विषयी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जी टिपणी केली, त्या विधानाची समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणावर खिल्ली उडवण्यात येत आहे. खासदार संजय राऊत आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काँग्रेसचे भारत बंद आंदोलन पूर्णपणे फसले आहे. परंतु हाच बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेरच पडले नसते, असं विधान केलं आणि त्यांच्या प्रतिक्रियेची समाज माध्यमांनी चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना या बंदमध्ये सहभागी झाली असती तर आज वेगळे चित्र दिसले असते. तत्पूर्वी शिवसेनेने या बंदला आधीच शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, या बंद खूप घाईमध्ये पुकारण्यात आला होता. तसेच राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण असल्यामुळे बंदसाठी ही योग्य वेळ नव्हती. त्याने लोकांच्या अडचणीत वाढ झाली असती. त्यातही, काँग्रेसने कोणाशीही चर्चा न करता भारत बंद पुकारला. त्यामुळे राज्यात हा भारत बंद पूर्णपणे फसला आहे. परंतु त्या तुलनेत यूपी आणि बिहार’मध्ये तिथले प्रमुख स्थानिक राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी झाल्याने तिथे बंद यशस्वी झाला. पण, महाराष्ट्रात शिवसेना रस्त्यावर न उतरल्याने ते शक्य झाले नाही, असे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून हा बंद यशस्वी झाल्याचा दावा केला जात असला तरी, गाड्या फोडणे किंवा दगड मारणे म्हणजे बंद नव्हे. सामान्य जनतेने त्यात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले पाहिजे. जर हाच बंद शिवसेनेने पुकारला असता तर लोक घरातून बाहेरच पडले नसते. तसेच रेल्वे आणि वाहतुकीची इतर साधने बंद राहिली असती, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं