नाहीतर सेनेचे आमदार-खासदार फुटण्याची शक्यता

नागपूर : शिवसेनेने २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर भाजपसोबत युती केली नाही तर शिवसेना पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार बाहेर पडतील असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. या विधानाने शिवसेना आणि रामदास आठवले यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने आगामी निवडणुकीत भाजप यावे अशी सर्वांचे प्रयत्नं आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याची शक्यता सुद्धा आठवलेंनी बोलून दाखविली आहे.
परंतु युतीसाठी सर्व प्रयत्नं करून सुद्धा शिवसेनेने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास उलट शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडण्याची शक्यता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. एकूणच आमदार आणि खासदार बाहेर पडल्याने शिवसेना पक्षात उभी फूट पडेल असं ते म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं