...नाहीतर सेनेला लोकसभेत मोठा फटका बसेल ?

मुंबई : आगामी निवडणुकीत शिवसेनेची भाजपसोबत आघाडी न झाल्यास शिवसेनेच्या निम्यापेक्षा अधिक जागा कमी होऊन त्यांना जेमतेम ९ जागा मिळतील अशी भीती शिवसेनेतीलच एक वरिष्ठ गटाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्ष नैतृत्वाने युतीचा फेरविचार करावा अशी भूमिका घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
तसेच भाजपमधील सुद्धा एका वरिष्ठ गटाला असं वाटतं की शिवसेने शिवाय आगामी निवडणुका भाजपला सुद्धा कठीण जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षातील मावळ पंथीय नेते शेवटी पुन्हा युतीसाठी एकमेकांच्या नैतृत्वावर दबाव आणू शकतात असं एकूणच वातावरण आहे. सध्याच्या मोदी सरकारविरोधात विविध विषयांवर जनतेमध्ये रोष वाढत असला तरी युती ही दोन्ही पक्षांची अपरिहार्यता आहे असं दोन्ही पक्षातील मावळ नेत्यांच्या गटाला वाटतं.
पालघर पोट निवडणुकीत शिवसेनेने सर्व शक्ती पणाला लावली तरी त्यांचा पराभव झाला हे सत्य आहे. पालघर निवडणुकीतच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आव्हाहन केलं असलं तरी देशपातळीवरील भाजप विरोधातील अगदीत शिवसेनेला धर्मनिरपेक्षता या विषयावर स्थान देणं शक्य नाही हे काँग्रेसने आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेनेबाबतची काँग्रेसप्रणित भाजपविरोधी आघाडीची ही भूमिका भाजपच्या पक्ष श्रेष्ठींकडे पोहोचल्याचे समजते. त्यामुळे भविष्यत युतीसाठी दोन्हीकडील मावळ नेते पुन्हा आग्रही होऊ शकतात.
आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे जर भाजप व शिवसेनेची युती न झाल्यास शिवसेनेला निम्या सुद्धा म्हणजे ९ जागा हाती लागतील अशी आकडेवारी समोर करण्यात येईल. नेमकी तीच आकडेवारी सेनेच्या पक्ष प्रमुखांपुढे सादर झाल्याने ते भविष्यात पुन्हा काय भूमिका घेतात ते महत्वाचे ठरणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं