'राम' काँग्रेस-जेडीएस'साठी धावून आले, गेम चेंजर कायदेतज्ञ

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सत्तास्थापनेतील पेच काल सर्वोच न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. कर्नाटकात भाजपाला कायद्याच्या कचाट्यात कसं पकडायचं हेच एक शस्त्र सध्यातरी काँग्रेस-जेडीएस कडे असलं तरी त्यातही वेळे अभावी अनेक अडचणी होत्या. परंतु त्यात देशातील सर्वात यशस्वी वकीलाने स्वतःच भाजप विरोधात थेट आव्हान देण्यासाठी उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस’च्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कर्नाटकात भाजपला कायद्याच्या कचाट्यात कसं पकडायचं हाच मुळात काँग्रेस-जेडीएस’साठी किचकट विषय होता. त्यात वेळेच्या मर्यादेमुळे सुद्धा दोन्ही पक्ष हैराण झाले असताना त्यांना एक आनंदाची वार्ता मिळाली आहे. कारण देशातील सर्वात यशस्वी वकील राम जेठमलानी यांनी कर्नाटकातील सत्तास्थापनेवरून थेट भाजप विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
ज्येष्ठ अनुभवी वकील राम जेठमलानी यांनी थेट प्रश्न केला की, ‘भाजपने कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी असं काय सांगितलं की त्यांनी भाजपकडे बहुमत नसतानाही त्यांना थेट सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आणि त्याचा खुलासा राज्यपाल वजुभाई वाला यांनी करावा अशी थेट विचारणा करत राम जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांनी, त्यांच्या मुद्द्यांवर सखोल विचार विनिमय केला. उद्या शुक्रवारी म्हणजे १८ मे रोजी न्यायमूर्ती ए.के. सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपीठापुढे काँग्रेसच्या कर्नाटक सत्तास्थापने संबंधित याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी स्वतः राम जेठमलानी यांना आपलं म्हणणं मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस’ला मोठा दिलासा समजावा लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं