सेना - भाजप षटकार मारण्याच्या तयारीत? लोकसभा - विधानसभा एकत्रित?

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखिल लोकसभे सोबत घेण्यात येतील अशी माहिती काही सूत्रांनी दिली असून शुक्रवारी विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने युतीच्या वेळेस भाजपला काही अटी सांगितल्या होत्या आणि त्यातली एक अट म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाव्यात.
रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर यांच्या वादाचं निमित्त पुढे करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’ वर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. आता जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर याचा सर्वाधिक फायदा शिवसेना – भाजपलाच होईल असे काही जाणकारांचे मत आहे. सध्या ज्या प्रकारे देशात वातावरण आहे त्यानुसार तरी भाजपचं पारडं जड असल्याचं काही विश्लेषक सांगतात.
नुकत्याच झालेल्या युतीच्या घोषणेत भाजप २५ तर शिवसेना २३ लोकसभेच्या जागा लढवणार आहे. आणि विधानसभेला मात्र ५०-५० चा फॉर्मुला निश्चित करण्यात आला आहे. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री बसेल अशी काहीशी युतीची सेटलमेंट आहे असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले परंतु शिवसेनेच्या रामदास कदमांनी केलेल्या काही वक्तव्यांवरून शिवसेना – भाजप अडीच – अडीच वर्ष मुख्यमंत्री असा फॉर्मुला असल्याची माहिती आहे.
सध्या भारतीय हवाई दलाने केलेले एअर स्ट्राईक आणि त्यामुळे देशात पसरलेली देशभक्तीची लाट याचा भाजपने पुरेपूर फायदा करून घेत उत्तर मार्केटिंग जमवलं. त्या विरुद्ध जर कोणी आवाज उठवला तर त्याला तात्काळ देशद्रोही ठरवण्याचे काम भाजप “IT” सेलने केले. आणि या सगळ्या घटनांचं फलित म्हणजे जर लोकसभा – विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर भाजप – शिवसेना वगळता ते सर्वच पक्षांना जड जाणार आहे.
दरम्यान, यापूर्वी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत. सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल अशी माहिती दिली होती. पण, आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं