भारत मोठ्या आर्थिक संकटात: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई : जागतिक बाजारपेठेत तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं वक्तव्यं खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरत असून देशात महागाई प्रचंड वाढत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी या मुलाखतीदरम्यान दिली आहे.
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने इराणमधून निर्यात केल्या जाणाऱ्या तेलावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे तेलाचे स्त्रोत कमी झाल्याने वर्षाच्या सुरुवातीपासूनच तेलाच्या किमती देशभर प्रचंड वाढत आहेत. परिणामी डॉलरच्या किमतीवर होत असून गेल्या काही महिन्यांत डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया तब्बल १३ टक्क्यांनी घसरला आहे.
एकाबाजूला रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत असताना देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती सुद्धा वाढत आहेत. याचा परिणाम थेट देशातील इतर वस्तूंच्या किमतींवर होत असून महागाई सुद्धा झपाट्याने वाढते आहे. त्यात भारतीय शेअर बाजाराचीस्थिती सुद्धा ढासळत असून गुंतवणूकदारांचे रोज नुकसान होत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये रोजची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळेच भारत एका मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जातो आहे असं मत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं