Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Indian Media stand during 26 11 attack on Mumbai and stand after pulawama attacked on crpf jawans | प्रसार माध्यमांच्या बदलत्या भूमिका? २६/११ चा भ्याड हल्ला ते पुलवामामधील हल्ला | महाराष्ट्रनामा – मराठी
29 April 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

प्रसार माध्यमांच्या बदलत्या भूमिका? २६/११ चा भ्याड हल्ला ते पुलवामामधील हल्ला

मुंबई : काल जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर मोठा आणि भ्याड दहशतवादी हल्ला झाला. दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सदर भ्याड हल्ला इतका भीषण होता की त्यात तब्बल ४० जवानांना वीर मरण आलं आहे. त्यातील अनेकांची तर ओळख होणं देखील कठीण झालं आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखात बुडालेला असताना महाराष्ट्रात मात्र एक वेगळंच राजकारण जोरदार पणे सुरु होतं. वास्तविक कालच्या घटनेनंतरची भारतीय प्रसार माध्यमांची भूमिका पाहिल्यास सत्ताधाऱ्यांना सावरून घेण्याचेच प्रकार सुरु असल्याचे प्रथम दर्शनी जाणवतं. त्यात प्रसार माध्यमांकडून ‘ही राजकारण करण्याची वेळ नाही’ या वाक्यप्रचारावर अधिक वापर होताना दिसत आहे.

परंतु, कालच्या घटनेनंतर प्रसार माध्यमं खरोखरच ‘कमर्शियल’ झाल्याचे ठळकपणे जाणवतं आहे. कारण, २६/११ रोजी मुंबईवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये देखील अनेक निरपराध लोकं आणि वरिष्ठ ते कनिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले होते. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताजमहलमध्ये तसेच अनेक घटनास्थळी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत फिल्म निर्माता राम गोपाळ वर्मा देखील उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमांनी विलासराव देशमुखांना टार्गेट करत अक्षरशः वार्तांकण करताना झोडपून काढलं होतं. तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर.आर. पाटील हे सदर घटनेवरून हिंदी वृत्तवाहिन्याला बाईट देताना हिंदीतील त्यांच्या बाईटमुळे वेगळेच गैरसमज पसरवले आणि आबा पाटील यांना देखील प्रसार माध्यमांनी अक्षरशः धारेवर धरले. वास्तविक आबा इतक्या संकुचित विचारांचे तर नव्हते, परंतु पक्के गावकरी वातावरणातून राजकारणात आलेले आणि हिंदी भाषिक लोकांच्या गोतावळ्यात न रमणाऱ्या आबांचं हिंदी एकदम कच्च, परिणामी बोलायचं होतं एक आणि अर्थ निघाला दुसराच. परंतु त्यावेळी सदर घटनेवरून भावनिक झालेल्या जनमानसात विलासराव देशमुख आणि आबांबद्दल रोष निर्माण करण्यात प्रसार माध्यमांना यश आलं.

त्यानंतर जनसमुदायाच्या भावनांचा विचार करून तेव्हा विलासराव देशमुख यांनी आपला राजीनामा दिला तो पक्षश्रेष्टींने सुद्धा मंजूर केला. तर आबा पाटील यांच्या छोटे-छोटे शहरो मे वाल्या ‘हिंदी’ डायलॉगचे बळी ठरले आणि त्यांना देखील राजीनामा द्यावा लागला. हिंदी भाषेच्या कमतरतेमुळे एखादया गावाकडच्या अस्सल मराठी राजकारण्याचं पद देखील जाऊ शकतं, याचं ते उत्तम उदाहरण झालं. आज या दोन्ही व्यक्ती आपल्यात नाहीत, परंतु त्या राजकारणातील उतुंग व्यक्ती आणि खरोखर जनमानसाचा आदर करणाऱ्याचं होत्या हे आज अधोरेखित होतं आहे. केवळ आणि केवळ मीडिया ट्रायलमुळे त्यांचा बळी गेला.

काल देखील पुलवामा जिल्ह्यात अशीच देशाला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. परंतु, इतकी भयानक घटना घडली असताना प्रसार माध्यमं जनमानसाचा सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष वाढणार नाही, याची शिस्तबद्ध काळजी घेत आहेत का? अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. देशाच्या वीर सुपुत्रांना सैनिकांना वीर मरण आलं असताना हि वेळ राजकारण करायची नाही याची ते वारंवार आठवण करून देत आहेत. परंतु, अशी घटना घडल्यानंतर देखील मातोश्रीवर युतीच्या वॅलेंटाईन डे’साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील चर्चेत व्यस्त राहिले. वास्तविक कालची त्यांची कृती सामान्य जनतेला अजिबात पटली नाही. परंतु, सध्या निवडणुकांचा मोसम येत असल्याने मोठ्या प्रमाणावर जाहिरातींच्या प्रतीक्षेत असलेली प्रसार माध्यम श्रीमंत सत्ताधाऱ्यांच्या कृतीवर अशी तुटून पडतील. कारण, देशावर होणारे हल्ले देखील सत्ताधारी सांगतील तसेच रंगवावे लागत आहेत. त्यामुळे एवढी भयानक घटना घडून देखील मातोश्रीवर युतीसाठी साजरा झालेला वॅलेंटाईन डे प्रसार माध्यमं कसं काय लोकांच्या मनात बिंबवतील, असा प्रश्न निर्माण होतो.

स्वतःला कडवे राष्ट्रभक्त हिंदुत्ववादी म्हणवणारी शिवसेना सुद्धा रात्री युती-युती असा खेळ खेळण्यात व्यस्त होती. कारण यांची युती झाली नसती तर देशावर प्रचंड मोठं संकटच येणार होते असा त्यांचा अभिर्भाव… पण एक गोष्ट लक्षात घेतली का? काल अनेक प्रसार माध्यमं भाजप-शिवसेनेच्या व्हॅलेंटाईन दे मध्ये मग्न होती आणि लोक मात्र संतापले होते. त्यावेळी युतीच्या बातम्यांवर लोकांनाच संताप ओसंडून वाहत होता. त्यानंतर काल युतीच्या मनोमिलनात व्यस्त असलेले उद्धव ठाकरे लोक भावना बघताच ‘पाकड्यांना जशास तसे उत्तर द्या’ ‘संसदेचं विशेष अधिवेशन बोलावा’ अशामागण्या मातोश्रीतून व्यक्त झाल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्तविक ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहयला नको होते. हा शुभारंभ व उद्घाटन कार्यक्रम बड्या रेल्वे अधिकार्‍याच्या हस्ते करता आला असता. मात्र जिथे तिथे चमकण्यासाठी व श्रेय घेण्याच्या लालसेपायी पंतप्रधान या उद्घाटनाला गेले व हसत हसत उद्घाटन केले.

उद्घाटन प्रसंगी नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आपल्या सरकारच्या कर्तबगारीची जाहिरात केली. एकीकडे चिंधड्या चिंधड्या झालेल्या जवानांच्या मांसाचे गोळे एकत्र करून ४३ शवपेट्यातून लष्कराच्या मुख्यालयात आणले जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सरकारच्या कामांचे प्रचारपत्र वाचत होते. हे सर्वच संतापजनक व उद्वेगजनक आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुलवामाच्या अवंतीपुरा येथे जवानांवर भीषण हल्ला होऊनही राजकीय सभा व बैठकात मश्गुल होते. त्याचवेळी काल संध्याकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केरळमध्ये भाजपाच्या प्रचाराची जाहीर सभा घेतली. केरळ हा कम्युनिस्टाचा बालेकिल्ला हिंदुत्ववादी विचारांनी जिंकण्याचा भाजपाने प्रयत्न चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्मठ हिंदुत्ववादी व संन्याशी असलेल्या आदित्यनाथांवर ही जबाबदारी सोपविली आहे.

परंतु एवढा दुखवटा व शोक व्यक्त करून मोदींनी उत्तराखंडातील रुद्रपुर येथील सभेसाठी जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांसमोर संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी दिल्लीतून मोबईलवर राजकीय भाषण केेल. तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीची खलबते करण्यासाठी पदाधिकर्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीची फलश्रुती म्हणून तब्येत बिघडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’ वर गेले. तेेथे लोकसभा-विधानसभा निवडणूक युतीची व जागा वाटपाची बोलणी झाली. एवढा भीषण हल्ला होऊनही या नेत्यांना राजकीय वाटाघाटीचे महत्त्व जास्त वाटले. त्यात हल्ला झाल्यानंतर समाज माध्यमांवरील भाजप समर्थकांच्या ग्रुपवर पुन्हा त्याच किळसवाण्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

परंतु, गुप्तचर यंत्रणांनी माहिती देऊन देखील कट यशस्वी झाला, परंतु सुरक्षा तज्ज्ञ अजित डोवाल म्हणजे काही प्रसार माध्यमांसाठी ‘नव्या भारताचे जेम्स बॉन्ड’ अशा फिल्मी बातम्या अनेकदा पाहायला मिळाल्या. त्यामुळे घटना काही असो, ती कशी प्रसारित करायची हे सत्ताधारीच ठरवतील हे अजून एकदा अधोरेखित झालं. कारण निवडणुका असल्याने जर सत्ताधाऱ्यांचं अपयश अधोरेखित केलं असतं तर कदाचित भाजपचा मार्ग खडतर झाला असता हे वास्तव आहे आणि त्याची काही प्रसार माध्यमांनी ‘ही राजकारण करण्याची वेळ नाही’ अशा बातम्या दिवसभर चालवून सत्ताधाऱ्यांविषयी वातावरण बिघडणार नाही याची विशेष काळजी घेतली आणि दिवंगत आबा पाटील तसेच विलासराव देशमुख यांच्याविरुद्ध मात्र प्रसार माध्यमांनी तत्कालीन सत्ताधारी म्हणून आक्रमक भूमिका घेतली. परंतु, त्या दोन नेत्यांनी लोकांची भावना लक्षात घेऊन पद त्याग केलेला. तर आताचे सत्ताधारी पद त्याग सोडा, १५-२० दिवसांसाठी अजून मंत्रिपद पदरात पाडून घेतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

x