रेल्वेत बिल मिळालं नाही तर जेवण फुकट, मार्चमध्ये? वाह रे टायमिंग!: सविस्तर कारण

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांनसाठी एक मोठी बातमी आहे. कारण रेल्वेमधून प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं अधिकृत बिल हातात मिळालं नाही, तर ते जेवण मोफत मिळणार आहे. मार्च महिन्यापासून रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचे तक्ते रेल्वेसह स्टेशनवर सर्व प्रवाशांना दिसतील अशा पद्धतीने सर्वत्र लावले जाणार असल्याचे समजते.
त्यावर ‘कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण तुम्हाला मोफत असणार आहे’ असा महत्त्वपूर्ण संदेश लिहिलेला असणार आहे. रेल्वेतील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वेच्या वरिष्ठ प्रशासनाची महत्वपूर्ण बैठकदिल्लीत पार पडली तेव्हा हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, रेलमंत्र्यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत सर्व ट्रेनमधील कॅटरिंग स्टाफ आणि टीटीई यांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन वितरीत करण्याचा सल्ला दिला आहे. या मशीनमध्ये स्वाइप करण्याची तसेच बिल जनरेट करण्याची सुविधा असेल. यामुळे जेवणासाठी प्रवाशांकडून अधिक किंमत आकारणाऱ्या कॅटररविरोधात होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासही मदत मिळणार आहे. तसेच ज्या ट्रेनमध्ये कॅटरिंग सुविधा आहे त्यांना जेवणाच्या किंमती दर्शवणारे तक्ते मार्च २०१९ पर्यंत तयार करण्याचा आदेश जारी करण्यात आले आहेत.
खरं तर रेल्वेतील कॅटरर त्यांना प्रवाशांकडून पैसे मिळावेत म्हणून बिल देणार नाहीत, असं तर होणार नाही. त्यामुळे फुकट वगरे या शब्दाला केवळ निवडणुकीची शब्दखेळी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसरं म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि आचारसंहिता लागण्याची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली आहे. आणि तसे झाल्यास त्याकाळात यासर्व गोष्टी जैसे थे राहतील. त्यामुळे भारतीय रेल्वेप्रशासनाला आणि मोदी सरकारला हे सर्व करण्यापासून साडेचार वर्ष कोणी रोखले होते, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. यामागील नियमातून सर्वात फायदा हा रेल्वेप्रशासनाचा होईल आणि नव्या पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीनसाठी मार्च आधी टेंडर निघतील हाच काय तो फायदा. परंतु, पत्रकार परिषद आयोजित करून “फुकट-मोफत” अशा शब्दांवर जोर देऊन निवडणुकीचे वेगळेच अप्रत्यक्ष संदेश आणि बातम्या पेरण्याचे खटाटोप केले जात आहेत असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं