क्रिकेटपटू गौतम गंभीरची दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप'मध्ये फिल्डिंग?

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम’मध्ये ओपनिंग करणारा गौतम गंभीर सध्या नवी खेळी करण्याच्या तयारीत असून, तो दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप’मध्ये फिल्डिंग लावत असल्याचे समजते. मागील अनेक दिवसांपासून तो क्रिकेटपासून दुरावला असून सध्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
दिल्लीतील सत्तेची चावी सध्या आम आदमी पक्षाकडे असल्याने भाजप सुद्धा २०१९ साठी प्रसिद्ध चेहरे शोधून त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याची तयारी करत आहे. त्यासाठी त्यांनी भारतीय टीमचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याची निवड केल्याचे समजते. भाजप त्याला लवकरच मोठी जवाबदारी सोपवलं असं समजत.
सध्या राजकारणात अनेक खेळाडूंना रस आल्याचे दिसत असून त्यात अनेकांनी तर थेट केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद सुद्धा मिळवली आहेत असं चित्र आहे. मुख्य म्हणजे नुकतच पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी तिथलाच एक माजी क्रिकेटपटू इम्रान खान विराजमान झाल्याने अजून अनेक भारतीय खेळाडू तसेच क्रिकेटपटू अचानक राजकारणात प्रवेश घेतील अशी शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं