तामिळनाडूत पोटनिवडणुकीच्या सर्व २० जागा लढणार: कमल हसन

चेन्नई : प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त महत्वाची घोषणा केली आहे. तामिळनाडू विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्वच्या सर्व म्हणजे २० जागा त्यांचा पक्ष संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची घोषणा केली. त्यानिमित्त पक्षाने वीस विधानसभा मतदारसंघात ८०% कार्यकर्ते नियुक्त केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने अजून कोणतीही अधिकृत घोषणा न केल्याने ‘विधानसभा पोटनिवडणूक नेमकी कधी होणार आहे, हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. परंतु, जेव्हा कधी त्या अधिकृतपणे जाहीर केल्या जातील, त्या पूर्ण ताकदीने लढण्यासाठी आम्ही सज्ज असू असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीनं पक्षाने मतदारसंघांमध्ये सक्षम कार्यकर्ते नेमले आहेत,’ असं कमल हसन यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं. सामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही ही लढाई लढतो आहोत. आमचा राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंध नाही. तसेच तामिळनाडू सरकारने भ्रष्टाचार संपवण्यासाठी उचललेल्या पावलांमुळं सामान्य जनतेलाच फायदा होईल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मद्रास हायकोर्टाने विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवत डीएमकेच्या तब्बल १८ आमदारांना अपात्र ठरवलं होतं. तसंच एम. करुणानिधी आणि ए.के.बोस यांच्या निधनानंतर तिरुवरूर आणि तिरुपरनकुंद्रम या २ जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं