कन्हैैयाकुमार करणार कॉँग्रेसमध्ये प्रवेश | तरुणांना प्राधान्य देण्याची प्रशांत किशोर यांची रणनिती?

नवी दिल्ली, १० सप्टेंबर | कॉँग्रेसमधील नेत्यांवर आता वरिष्ठ नेतृत्वाचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे इतर पक्ष आणि सामाजिक संघटनांमधील तरुणांना पक्षात आणण्याची रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली आहे. जेएनयूचा विद्यार्थी नेता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता कन्हैैयाकुमार कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
कन्हैैयाकुमार करणार कॉँग्रेसमध्ये प्रवेश, तरुणांना प्राधान्य देण्याची प्रशांत किशोर यांची रणनिती? – Kanhaiya Kumar may join Congress party as per Prashant Kishor’s strategy :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तसेच प्रशांत किशोर यांची कन्हैैयाकुमार याने भेट घेतली आहे. यामुळे तो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. डाव्या पक्षात राहून कन्हैय्या कुमारचा अपेक्षाभंग झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रशांत किशोर यांची भेट घेतली याचा अर्थ कन्हैय्या कुमार काँग्रेसची वाट धरू शकतो.
काँग्रेस पक्षातील जुन्या-जाणत्या नेत्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता युवकांना प्राधान्य आणि संधी दिली पाहिजे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना दिल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दीड वषार्पासून कन्हैय्या कुमार राजकारणात कमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कन्हैय्या कुमारच्या भाषण देण्याच्या शैलीचा काँग्रेसला चांगला फायदा होऊ शकतो, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. तसेच युवकांना संधी देण्याचा सल्ला प्रत्यक्षात आणण्यासाठी कन्हैय्या कुमारला काँग्रेसमध्ये दिला जाऊ शकतो.
आगामी काही महिन्यांमध्ये ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आहे. या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांप्रमाणे काँग्रेसकडूनही रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर आता काँग्रेससाठी काम करू लागले आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Kanhaiya Kumar may join Congress party as per Prashant Kishor’s strategy.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं