कर्नाटकात पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त करून काँग्रेसची मोदींना वाढदिवसाची भेट

बंगळुरू : देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असून परिणामी महागाईचा भडका उडाला आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे मोदी सरकार विरोधात जनतेचा रोष वाढत असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी २ रुपयांची कपात करून सामान्यांना दिलासा दिला आहे.
मोदींच्या वाढदिवसादिवशी कर्नाटकातील मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त करत असल्याची आज घोषणा केली. त्यामुळे कर्नाटकातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सत्तेतील भागीदार काँग्रेसने संधी साधत भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मोदींना चिमटा काढत म्हटलं आहे की,’आमच्या सरकारने राज्यात इंधनाचे दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आज मोदींचा वाढदिवस असल्याने त्यांच्यासाठी ही वाढदिवसाची भेट आहे’, असा टोला लगावतानाच ‘जर राज्य सरकार इंधन दर कमी करू शकते तर केंद्र सरकार इंधन दरात कपात का करत नाही?,’ असा सवाल काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसप्रणित सरकारच्या या निर्णयामुळे भाजप प्रणित सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. जर आम्ही हे शक्य करू शकतो तर भाजप सरकारला हे का शक्य नाही, असा संदेश देत भाजपला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं