कर्नाटक विधानसभा, देवेगौडांची नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं

कर्नाटक : राजकीय मतभेद असलेले माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर स्तुती केल्याने सगळयांच्या भुवया उंचावल्या असून निवडणुकीनंतर भाजपा आणि जेडीएसमध्ये आघाडी होणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
प्रथम मोदींनी देवेगौडांची स्तुती केली होती आणि आता देवेगौडां यांनी नरेंद्र मोदींची स्तुती करत त्याची परत फेड केली आहे. देवेगौडां मोदींची स्तुती करताना म्हणाले की,’मोदींमुळे खासदार संसदेत चांगलं काम करताहेत. मोदी हे स्मार्ट पंतप्रधान असून देशातील महत्त्वाचे मुद्दे त्यांना नीट माहिती आहेत, असंही देवेगौडा यांनी म्हटलं.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर निवडणूक प्रचारादरम्यान स्तुतीसुमने उधळल्याने निवडणूक निकालानंतर भाजपा आणि जेडीएसमध्ये आघाडी होणार अशी कर्नाटकात राजकीय चर्चा रंगली आहे. या आघाडीचा चर्चेला उत्तर देताना देवेगौडा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती हा केवळ शिष्टाचाराचा भाग असून त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये तसेच भाजप बरोबर कोणतीही आघाडी होणार नसल्याचं देवेगौडा यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान देवेगौडांनी म्हटलंय की, २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यास मी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देईन, असं मी म्हटलं होतं. त्यावर मी तसा निर्णयही घेतला होता. परंतु नरेंद्र मोदींनी त्यावर मला फेरविचार करण्यास सांगितलं होत. तसेच त्यांनी मला निर्णय बदलण्याची विनंती केली होती. देशाच्या लोकसभेत वरिष्ठ नेत्यांची आवश्यकता आहे असं नरेंद्र मोदींनी त्यावेळी मला सांगितलं होतं,’ असंही देवगौडा यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं.
राहुल गांधी माझ्याबद्दल जे काही म्हणाले ते नरेंद्र मोदींनी ऐकलं असेल कदाचित असं देवेगौडा म्हणाले. नरेंद्र मोदींच कौतुक हा केवळ शिष्टाचाराचा भाग आहे, त्यामुळे आमच्यातील राजकीय मतभेद संपले असा त्याचा राजकीय अर्थ होत नाही असं सुद्धा देवेगौडा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं