पालघर टायमिंग, मनसेतून गेलेले ते ६ नगरसेवक 'डेंजर-झोन' मध्ये ?

मुंबई : कोकण आयुक्तांनी ७ मे रोजी मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील त्या ६ नगरसेवकांना नोटीस पाठवली असून १४ मे रोजी सुनावणी असल्याचे समजते.
परंतु कोकण आयुक्तांनी दिलेल्या नोटीस प्रमाणे सुनावणीची तारीख १४ मे रोजी असल्याने त्याचा टायमिंग थेट पालघर लोकसभा पोटनिवडणुकीशी जोडला जाऊ लागला आहे. कारण ७ मे रोजी शिवसेनेने मातोश्रीवर पालघर पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याबाबत बैठक घेतली होती आणि १४ मे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने वेगळेच राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १४ मे आहे आणि कोकण आयुक्तांनी मनसेच्या त्या ६ फुटीरवादी नगरसेवकांना दिलेल्या नोटीसची सुनावणी सुद्धा १४ मे रोजीच आहे. त्यामुळे शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडण्यासाठी तर हे टायमिंग साधले का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
मनसेतून ६ नगरसेवकांनी थेट मातोश्री वर हजेरी लावली होती. त्या नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी देऊन पक्षात आणल्याचा शिवसेनेवर आरोप करण्यात आला होता. त्यात मनसेच्या नगरसेवकांना फोडण्यात दिलीप लांडे यांचा मोठा हात होता असं बोललं जातं आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी इतर नगरसेवकांना पक्षापासून दूर केले असा सुद्धा आरोप करण्यात येत होता. इतर नगरसेवकांच्या हाती काही लागलं नसलं तरी दिलीप लांडे स्वतःसाठी महापालिकेत पद आणि २०१९ ला आमदारकीच्या तिकिटाच आश्वासन मिळविण्यात यशस्वी झाले. पण दिलीप लांडेंच्या स्वार्थी राजकारणामुळे अखेर हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्नर कदम, अश्विनी माटेकर या इतर ५ जणांचं नगरसेवक पद सुद्धा धोक्यात आलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं