'जेडीएस'च्या आमदारांना भाजपाने १०० कोटींची ऑफर दिली: कुमारस्वामी

बंगळुरू : भाषणात गरिबांचे सेवक असल्याचे नरेन्द्र मोदी सांगतात मग यांच्याकडे इतका काळा पैसा येतो कुठून असा प्रश्न जनता दल सेक्युलरचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी यांनी केला आहे. इतकाच नाही तर यांच्याकडे इतका काळा पैसा असताना आयकर विभागाचे अधिकारी काय करत आहेत असं सुद्धा त्यांनी ठणकावून विचारलं.
भाजप आमच्या आमदारांना शंभर कोटींची ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप कुमारस्वामी यांनी भाजपवर केला आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांचे अमिश दाखविले जात आहे अस ही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.
एकूणच विधानसभेच्या निकालावर आम्ही समाधानी नसून कर्नाटकात मोदींची लाट नसून सुद्धा भाजपला यश मिळत आहे असं बोलून त्यांनी एक प्रकारे निवडणूक प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली आहे. भाजपने गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी जे केलं ते सर्वश्रुत आहे असं ही कुमारस्वामी म्हणाले. कर्नाटक विधानसभेत आवश्यक असलेला आकडा आमच्याकडे आहे असं दावा सुद्धा त्यांनी केला.
आम्हाला काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून ऑफर होती. परंतु २००४ -०५ मध्ये भाजप बरोबर जाण्याने माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा कलंक लागला होता आणि तो पुसण्यासाठीच आम्ही आज काँग्रेस सोबत आहोत असं कुमारस्वामींनी आवर्जून सांगितलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं