सोशल मीडिया स्ट्रॅटेजिसाठी काँग्रेसकडून देशातील ३ मोठ्या एजन्सीची नेमणूक

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका घोषित झाल्यावर सर्वच पक्ष प्रचार योजना आणि उमेदवारांच्या निवडीत दंग झाले आहेत. या लोकसभा निवडणुकीत समाज माध्यमांचा प्रभावी, नियोजनबद्ध तसेच भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी देशातील ३ मोठ्या एजन्सींना नेमले आहे. त्यामध्ये डिझाईनबाक्सड, निकसन आणि सिल्वरपुष या बड्या नावांचा समावेश आहे.
योजनेनुसार भाजपच्या #मैंभीचौकीदार या उपक्रमाला जोरदार प्रतिउत्तर देण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर देण्याची योजना या टीमने तयार केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांकडे आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून भाजपाला घेरण्याची योजना असल्याचे समजते. समाज माध्यमं या निवडणुकीत प्रभावी भूमिका पार पाडणार असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षांनुसार या लोकसभा निवडणुकीत तब्बल ५० हजार कोटी रुपये देशभर उधळले जाणार आहेत. तसेच केवळ समाज माध्यमांवरील प्रचारावर ५००० कोटी रुपये देशभरात खर्च केले जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वायफळ मार्केटिंग करणाऱ्या संस्थांना टाळून केवळ योग्य वर्गीकरण करून त्यानुसार योजना करणाऱ्या आणि त्या योग्य प्रकारे राबवणाऱ्या एजन्सीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून समाज माध्यमांवर तुंबळ युद्ध रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं