शाळेची फी भरायला जमत नसेल तर जा आणि मरा, तुमची जी इच्छा आहे ते करा - एमपी'चे शिक्षणमंत्री इंदर सिंग

भोपाळ, ३० जून | मध्य प्रदेशामध्ये कोरोनाकाळात खाजगी शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं जात असल्याची तक्रार आणि अडचण सांगण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार यांनी दिलेल्या उत्तरामुळे पालकांमध्ये आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतं आहे.
एकाबाजूला शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या पालकांचं म्हणणं ऐकून घेणार नसेल तर काय करावं असं विचारलं असताना मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री इंदर सिंग यांनी जाऊन मरा असं उत्तर दिलं. यामुळे राज्यभर पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जर इंदर सिंग परमार यांनी स्वत: राजीनामा दिला नाही तर त्यांनी मंत्रीमंडळातून बाहेर काढण्याची मागणी उचलून धरली आहे. परिणामी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.
मध्य प्रदेश पालक महासंघाचे प्रतिनिधी इंदर सिंग परमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी पालकांनी हायकोर्टाच्या आदेशानंतर देखील खाजगी शाळा अधिक फी आकारात असल्याची तक्रार केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने कोरोना महामारीदरम्यान शाळांना अतिरिक्त फी घेऊ नये असा आदेश दिला आहे.
पालकांनी यावेळी इंदर सिंग परमार यांना मध्यस्थी करत फी कमी करण्यासाठी मदतीची विनंती केली. यावेळी शाळा शिक्षण विभागच आपलं ऐकून घेत नसेल तर काय करावं असं यावेळी पालकांनी विचारलं असता चिडलेल्या इंदर सिंग परमार यांनी, “जा आणि मरा…तुमची जी इच्छा आहे ते करा,” असं उत्तर दिलं.
पालक महासंघाचे अध्यक्ष कमल विश्वकर्मा यांनी यावेळी इंदर सिंग परमार यांनी पालकांची माफी मागितली पाहिजे तसंच गाऱ्हाणं ऐकण्याची इच्छा नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनीदेखील टीका केली असून इंदर सिंग परमार यांना निर्लज्ज म्हटलं आहे. त्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Madhya Pradesh Education Minister Inder Singh Parmar controversial reply to Parents Union
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं