महाराष्ट्रातील शिक्षकांना 'वंदे गुजरात' या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षणाचा 'विनोदी' घाट

नाशिक : काही दिवसांपूर्वी इयत्ता ८ वीच्या पुस्तकात गुजराती भाषेत मजकूर छापून आल्याचे गंभीर प्रकरण अजून ताजे असताना त्यात अजून एका शैक्षणिक ‘विनोदी’ निर्णय घेण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील शिक्षकांना थेट ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा “अति विनोदी” घाट महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने घातला आहे.
इयत्ता पहिली तसेच आठवीच्या अभ्यासक्रमात नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. या नव्या अभ्यासक्रमासाठी संबंधित विषयासाठी शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्चुअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परंतु राज्याच्या शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी ‘सह्याद्री’ वहिनीला डावलून ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीची ‘विनोदी’ निवड केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अजून धक्कादायक म्हणजे जी वाहिनी महाराष्ट्रात दिसतच नाही त्या वाहिनीची जबरदस्ती करून ‘डिश बॉक्स बसवावा’ अथवा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ (इथेही गुजराती) अँपमधील वंदे गुजरात वाहिनी बघावी, असे विनोदी आदेश देण्यात आले आहेत.
त्यात कहर म्हणजे ज्या शाळांमध्ये टीव्ही नसतील, त्या शाळेतील शिक्षकांनी दुसऱ्या शाळेत जिथे टीव्ही उपलब्ध आहे अशा ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्यात शिक्षकांना सुद्धा प्रश्न पडला आहे की आता हे प्रशिक्षण गुजरातीत नसले म्हणजे मिळवलं, परंतु सरकारला गुजरातचा इतका ‘विनोदी’ पुळका कशासाठी असा प्रश्न तमाम शिक्षकांना पडला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं