एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

जळगांव : सध्या मंत्रिपदावर नसलेले जळगांव चे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्टवादी कॉंग्रेस च्या वाटेवर असल्याची चर्च्या राजकीय गोटात चालू झाली आहे. तशी बोलकी प्रतिक्रियाही राष्टवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
मध्यंतरी गाजलेल्या भोसरी एम.आय.डी.सी जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात एकनाथ खडसे यांच्या संबंधित नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल ही निरर्थक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला उत्तर देताना म्हटले होते. त्यामुळे त्यांची घरवापसी ही लांबणीवर गेल्याचे बोलले जात होते.
त्यामुळेच अखेर नाराज असलेले एकनाथ खडसे हे विरोधकांच्या गळाला लागले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू झाली आहे. येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोललं जातंय.
लवकरच जळगाव मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नैतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित होणार आहे. त्याचवेळी राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंव्हा मित्र ही नसतो असे म्हणून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक एकनाथ खडसें यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चे संकेत पत्रकारांशी बोलताना दिले.
तर दुसरीकडे एकनाथ खडसे हे भाजप कधीही सोडणार नाहीत आणि ही राष्ट्रवादीची जुनी राजकीय खेळी आहे असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं