अंगणवाडी सेविकांवर मेस्मा कायदा लावण्याचा युती सरकारचा डाव उधळला

मुंबई : अंगणवाडी सेविकांचं काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याचे कारण पुढे करून त्यांचा संप उधळून लावण्याच्या दृष्टीकोनातून महिला आणि बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याच्या कचाट्यात आणले होते.
सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी भाजप-शिवसेना सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. गेली दोन दिवसांपासून विरोधकांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायद्यावरून सभागृह अक्षरशः दणाणून सोडले होते. त्यानंतर विरोधकांच्या तिखट दबावानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला स्थागिती देण्याचा निर्णय घेतला आणि तशी माहिती सभागृहाला दिली.
केवळ अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप करू नये आणि सरकारची पुन्हा नाचक्की होऊ नये म्हणूनच अंगणवाडी सेविकांना मेस्मा अंतर्गत आणून त्यांचा संप हाणून पाडण्याचा भाजप-शिवसेना सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधांनी केला होता. सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरच सत्ताधारी शिवसेनेने सुद्धा सभागृहात त्याबद्दल आवाज उचलला होता. अखेर विरोधकांच्या त्या मागणीला यश आले आणि मुखमंत्र्यांनी विरोधकांची मागणी मान्य करत अखेर मेस्मा कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं