विधानसभा उपाध्यक्ष: डिसेंबरमध्ये सत्ता सोडणार होते, पण नोव्हेंबरमध्ये अजून एका पदावर दावा

मुंबई : दसरा-दिवाळी असे महत्वाचे सण संपताच म्हणजे डिसेंबरमध्ये शिवसेना सत्ता सोडणार असे खासदार विनायक राऊत काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. तसेच आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आणि भाजप सोबत युती नाही म्हणजे नाही, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने डिसेंबर सुरु होण्याच्या एक दिवस आधी विधानसभेच्या उपाध्यक्ष जागेसाठी अर्ज दाखल केला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अहमदनगरमधील पारनेरचे आमदार विजय औटी यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला आहे. जवळपास ४ वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदावर शिवसेनेचे औटी विराजमान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच युती टिकवण्यासाठी भाजपने शिवसेनेला गाजर दाखवल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे. भारतीय जनता पार्टीने आगामी निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेला गळ टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आगामी निवडणुकीत सुद्धा शिवसेना स्वतंत्र लढण्याचे सांगत असली तरी भाजपने काही दिवसांपूर्वीच जाहिर केलेल्या महामंडळ अध्यक्षांच्या निवडीत शिवसेनेला स्थान दिले होते. त्यामुळे ही आगामी निवडणुकीत युतीसाठी आणि युतीदरम्यान अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना स्वतःच जाणीवपूर्वक प्रयत्न तर करत नाही ना अशी चर्चा रंगली आहे.
सध्या दोन्ही पक्षांच्या बलाबलाचा विचार केल्यास विधानसभेत भाजपकडे १२३ तर शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. बहुमत युतीच्या बाजूने असल्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं