भाजपने कोकणात शिवसेनेला धूळ चारली, तर सेनेने मुंबईची जागा पुन्हा राखली

मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे. पण दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आले, त्यात भाजपने शिवसेनेवर मात केली असून शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भाजपने कोकणात आयत्यावेळी आखलेले ‘डाव’ खरे ठरले आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कट करून विलास पोतनीस यांना संधी देण्यात आली होती. त्यात विलास पोतनीस यांनी भाजपचे उमेदवार अमित मेहता यांचा पराभव केला असून मुंबईची जागा राखण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघाची जागा लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी तिसऱ्यांदा स्वतःकडे राखली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाला असून त्यांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून तिथे भुजबळांची साथ मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं