राज्य सरकार 'पी-तू' मोहीम राबविणार...आता दारु सुद्धा घरपोच मिळणार?

मुंबई : दारूच्या शौकिनांसाठी राज्य सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र सरकार आता एक नवीन धोरण अंमलात आणण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी सुद्धा थेट तुमच्या घरपोच दिली जाईल. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे असं समजत. त्यामुळे दारू घरपोच देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरू शकत.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणारे अपघात टाळणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. दारूच्या नशेत गाडी चालवून होणाऱ्या अपघातांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अनेक जण प्राण गमावतात असं आकडेवारी सांगते. ज्याप्रमाणे इ-कॉमर्स वेबसाइट मार्फत भाजी – फळे आदी घरपोच येतात, त्याप्रमाणेच दारू सुद्धा घरपोच येईल.’ असं बावनकुळे म्हणाले.
परंतु ऑनलाइन दारू मागण्यासाठी ग्राहकाला वयाचा दाखला, ग्राहकांची आधार क्रमांकासह संपूर्ण माहिती घेऊन ओळख पटविणे अनिवार्य असेल असं सुद्धा बावनकुळे म्हणाले. अपघातांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास २०१५ मध्ये एकूण रस्ते अपघातांच्या १.५ टक्के म्हणजेच ४ लाख ६४ हजार अपघात ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे होते. त्यातील तब्बल, ६,२९५ जण या अपघातांमध्ये जखमी झाल्याची सरकार दरबारी नोंद आहे. त्यानुसार दिवसाला सरासरी ८ मृत्यू हे दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे झालेल्या अपघातांमुळे होतात असं समोर येत आहे.
दरम्यान, दारुबंदीची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी मात्र महाराष्ट्र सरकारच्या या योजनेवर सडकून टीका केली. ‘अशा प्रकारे दारु घरपोच पुरवणं हे घटनाबाह्य तर आहेच, शिवाय याचे इतर दुष्परिणाम सुद्धा होतील. घटनेचं ४७ वं कलमानुसार,अंमली पेय, पदार्थांच्या विक्रीला घटनेतच प्रतिबंध केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात दारुचं व्यसन वाढेल आणि याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा,’ असं गोस्वामी म्हणाल्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं