मीरारोडचे रहिवासी मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकाकुल, पण भाजप नेते पार्टीत दंग

मीरारोड : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ भारतीय जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली असताना मीरारोडचे स्थानिक भाजप नेते पार्टीत दंग झाले आहेत. भाजपचे स्थानिक नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस स्थानिक नेतेमंडळी तसेच आमदारांनी एकदम धुमधडाक्यात साजरा केला आहे.
केवळ पार्टीचं नाही तर अगदी डिजेच्या दणदणाटात करत स्थानिक भाजपने नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस साजरा केला. ज्या ठिकाणी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती तिथून शहीद मेजर राणे यांचं घर एका हाकेच्या अंतरावर असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे स्थानिक भाजप प्रतिनिधींना या विषयच किती गांभीर्य आहे ते स्पष्ट होत आहे.
या समारंभात मीरारोड महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता, स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह भाजपचे अनेक स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या सर्वांनी सोशल मीडियावर शहीद राणे यांना आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या. मात्र सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहून दुसऱ्या बाजूला या कार्यक्रमातील हेच भाजपचे नेते स्वतःच आनंदाने समाजमाध्यमांवर पोस्ट टाकून पार्टीचे अपडेट्स देत होते. भाजपा नेत्यांच्या या वागणुकीमुळे संपूर्ण मीरारोड शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं