मलकापूर नगरपरिषद निवडणूक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे. परंतु, मतदानानंतरचे प्राथमिक कल पाहता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात घमासान होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले जाणारे भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे दोघांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असलेली ही निवडणूक म्हणजे कराड मतदारसंघातील रंगीत तालीमच समजली जाते आहे. तसेच सदर निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले हे दोघे ही नेते कराडमध्येच ठाण मांडून बसले होते. एकूण ९ प्रभागात १९ जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं