पक्षप्रमुख अयोध्याला असताना अनेकांचा सेनेला राम-राम करत शिवसंग्राममध्ये प्रवेश

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला राम राम करत शिवसंग्राम पक्षाचा भगवा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला जयमहाराष्ट्र करताना पक्षाचे विधानसभा प्रमुख सुदर्शन धांडे यांनी “शिवसैनिक वाघांनो सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा” ही समाज माध्यमांवर टाकलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे.
काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेने सचिन मुळूक तसेच कुंडलिक खांडे यांच्यावर जिल्हाप्रमुख सारख्या महत्वाच्या पदांची जवाबदारी दिली होती. सचिन मुळूक यांच्याकडे केज, माजलगाव आणि परळी या महत्वाच्या ३ मतदार संघाची जवाबदारी आणि कुंडलिक खांडे यांच्याकडे पक्षाचे बीड, गेवराई आणि आष्टी ३ प्रमुख मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख, विधानसभा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख आदी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली आणि स्थानिक राजकारणाला सुरुवात झाली झाली. त्यात अनेक जुन्या आणि कट्टर शिवसैनिकांनी समाज माध्यमांवर तिखट भावना व्यक्त करायला सुरुवात केली होती.
दरम्यान, शिवसेनेने ” पहिले मंदिर फिर सरकार’ चा नारा देत अयोध्येवर कुच केली. मागच्या तीन दिवसांपासून विविध माध्यमांवर शिवसेनेचीच चर्चा आहे. या मोहिमेत दोन्ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्यातील इतर प्रमुख पदाधिकारीही या मोहिमेत सहभागी झाले. शनिवारी उद्धव ठाकरेंनी शरयु नदीतीरी आरती करतेवेळी जिल्ह्यातील मंदिरांतही शिवसैनिकांनी आरतीचा गजर केला.
विशेष म्हणजे अयोध्येला दौऱ्यावर गेलेले स्थानिक पदाधिकारी तेथील फोटो सोशल मिडीयावर शेअर होत असताना माजी शहरप्रमुख, पक्षाचे बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहिलेले आणि सध्या विधानसभाप्रमुखपदाची जबाबदारी असलेल्या सुदर्शन धांडे यांनी “अखेरचा जय महाराष्ट्र’ म्हणण्याबरोबच “शिवसैनिकांनो सावधान सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा’ अशी पोस्ट टाकून शिवसेनेतील खदखद जाहीर केली होती. बीडमध्ये पक्षविस्तार करण्यासाठी सरसावलेल्या पक्ष नैतृत्वाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच इंगा दाखवल्याचे स्थानिक लोकं बोलत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं