मराठा आरक्षण; चाकण'मध्ये अनेक बसेसची जाळपोळ

पुणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी चाकणमध्ये हिंसक मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. कारण आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी संतप्त होऊन २३-३० बसेस जाळल्या आहेत. त्यामुळे चाकण पोलिसांनी जमावबंदी सुरु केली आहे.
चाकणमधील मोर्च्यात आक्रमक मोर्चेकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून तर धरलाच, शिवाय समोर येणाऱ्या प्रत्येक बसेवर तुफान दगडफेक करत अनेक बसेसची जाळपोळ केली. दरम्यान आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा केला. सध्या चाकणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण झालं आहे असं वृत्त आहे.
काही वेळाने आक्रमक आंदोलकांनी २५-३० बसेस जळताच लोकांमध्ये खूप धावपळ झाली आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीमारही केला. सरकार आता यापुढे कोणती भूमिका घेते ते पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं