औरंगाबाद; मराठा आरक्षण मोर्चेकऱ्यांची उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी आणि राडा

औरंगाबाद : औरंगाबादेत मराठा आरक्षण मोर्चेकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने मराठा क्रांतिमोर्चातील आंदोलक आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला झाल्याचे वृत्त आहे.
मराठा आंदोलकांमधील घोषणाबाजी करणाऱ्या एका आंदोलकाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मारहाण सुद्धा केली आहे. औरंगाबादमधील क्रांती चौकात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्याठिकाणी प्रचंड तणावाच वातावरण निर्माण झाल होत. दरम्यान बाचाबाची झाल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
महाराष्ट्र बंद असल्याने आंदोलक सकाळीच शहरात जमायला सुरुवात झाली होती. त्याचवेळी ही घोषणाबाजी झाली आणि त्याचवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे दाखल झाले आणि त्यांनी एका आंदोलनकर्त्यास मारहाण केली. त्यानांतर संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी दानवे यांच्या समोरच आणखी जोरजोरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यातील काही आंदोलकांनी तर थेट दानवे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती जास्त चिघळू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत योग्य ती काळजी घेतली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं