आगामी निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम'ची युती, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार

औरंगाबाद : राज्यातील आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमने युती केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांनी आघाडी केल्याने राज्यात इतर पक्षांसमोर आणि विशेष करून काँग्रेस व राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. या दोन्ही पक्षांनी दलित-मुस्लिम ऐक्याचा नारा दिली आहे. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये २ ऑक्टोबरला हे दोन्ही पक्षांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांचा आज पर्यंत केवळ मतांसाठी वापर करण्यात आल्याचं सांगताना २ ऑक्टोबरला राज्यात आम्ही राजकीय भूकंप करणार असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले. त्यामुळे दोन्ही पक्ष राज्यात एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्याचा पहिला प्रयोग अहमदनगर महापालिकेत केला जाणार असल्याचं समजतं.
स्वतः प्रकाश आंबेडकर या आघाडीचं नैतृत्व करणार आहेत. त्यामुळे या आघाडीने सर्वाधिक डोकेदुखी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होणार आहे. त्याचा सर्वाधिक तोटा काँग्रेस आणि एनसीपीला होऊन भाजपला थेट फायदा होण्याची शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं