जसे अलीबाबा के ४० चोर होते, तसे शिंदे बाबा के ४० चोर ओळखले जातील | शिंदे गटातील मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचं बिंग फोडण्यास सुरुवात

Minister Gulabrao Patil | देशभरामध्ये आज शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण अशाच एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल, तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी फोडा, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
आजकालच्या दुनियेत कोण करप्ट नाहीये? सर्वच करप्ट आहे, आजची दुनिया आणि आजकाल आमच्यावरही आरोप चाललेत, सब कुछ ओके आणि 50 खोके. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वादग्रस्त विधान केलं. दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान कालच्या एका कार्यक्रमातही बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टोकाची टीका केली. “Who is आदित्य ठाकरे? गोधडीत पण नव्हता. आम्ही तेव्हाही शिवसेनेत होतो. याला काय अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?”, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला. तसेच जसे अलीबाबा के ४० चोर होते, तसे शिंदे बाबा के ४० चोर ओळखले जातील असं अजून एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी ऑन रेकॉर्ड केलं आहे.
इतिहास अलीबाबा चालिस चोर तसेच…..? pic.twitter.com/f3LSpRZOnF
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) September 5, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Minister Gulabrao Patil controversial statement check details 05 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं