रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंचा पाळलेला कुत्रा: नितेश राणे

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी काल खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी रामदास कदमांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
काल एका पक्षीय मेळाव्यात रामदास कदम यांनी उपस्थितांसमोर भाषण करताना म्हटलं होतं की, ‘या राणेंनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले. सर्वात आधी ते शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. आता भारतीय जनता पक्षात आले आहेत. आता केवळ रामदास आठवलेंचा आरपीआय पक्ष शिल्लक राहिला आहे. नारायण राणे फक्त मातोश्रीवर टीका करत असतात. परंतु, स्वतःची तेवढी औकात आहे काय, हे सुद्धा त्यांनी एकदा तपासून पाहावं. पण शिवसेनेच्या जोरावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलाबाळांनी कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे. त्यामुळे मातोश्रीवर टीका करण्याची त्यांची औकात आहे का? नारायण राणेंसारख्या व्यक्तीला ‘सूर्याजी पिसाळची अवलाद’ ही उपमादेखील कमी पडेल. त्यामुळे नारायण राणे हा या कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही” असं भाष्य कदम यांनी केले.
त्यानंतर, आमदार नितेश राणे यांनी सुद्धा अपेक्षित प्रतिऊत्तर दिले आहे. त्यांनी रामदास कदम यांची तुलना थेट मातोश्रीवरील कुत्र्याशी केली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “स्व. मान बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात..उद्धव ठाकरें नी सुद्धा तीच परंपरा चालु ठेवली आहे…रामदास कदम च्या रुपत!! सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही..भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!” असं जिव्हारी लागणार ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे यावर रामदास कदम किंवा शिवसेनेकडून पुन्हा कोणती प्रतिक्रिया येते का ते पाहावं लागणार आहे.
स्व.मान बाळासाहेब असतील,राजसाहेब असतील यांना कुत्रे आवडतात..
उद्धव ठाकरे नी पण तीच परंपरा चालु ठेवली आहे..
रामदास कदम च्या रुपत!!
सतत भोकत असतो..त्याला हे माहित नाही..
भूकणारे कुत्रे कधी चावत नाहीत !!— nitesh rane (@NiteshNRane) December 14, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं