शिवेंद्रराजे व नरेंद्र पाटील यांच्यात मिसळ पे चर्चा! उदयनराजेंविरुद्ध रणनीती?

सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने वेगवेगळ्या रणनीती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात एनसीपीने विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर विरोधकांमध्ये जोरदार राजकीय वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. या विषयाच्या अनुषंगाने, शिवेंद्रसिंहराजे आणि भाजपाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील आज एकत्र मिसळ खाताना दिसल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.
साताऱ्यातील चंद्रविलास हॉटेल मिसळीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. इथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते. परंतु, आज राजकीय तर्रीमुळे इथली मिसळ भलतीच चवदार-चविष्ट होऊन गेली. शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांनी या हॉटेलमध्ये एकत्र नाश्ता केला. त्यांची ही ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’ साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या महिन्यात, झालं गेलं विसरून जाऊन मनोमीलनाचे संकेत देणारे दोन राजे पुन्हा आमने-सामने उभे ठाकणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं