'हॅप्पी प्रजेची सत्ता' ‘हॅप्पी रिपब्लिक डे’ मेसेज आड शोधणाऱ्यांना व्यंगचित्रच समजलं नाही?

मुंबई : वास्तविक इतिहासाचा आढावा घेतल्यास समाज माध्यमं नसून देखील तत्कालीन प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी प्रसिद्ध केलेली व्यंगचित्र आणि त्यामागील विचार सामान्यांना अचूक समजत असे आणि ते समाजावर होकारात्मक परिणाम करणारं ठरत असे. अगदी उदाहरच द्यायचे झाले तर, स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे अर्थात बाळ केशव ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराने १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. मात्र मनोरंजनाखातर बनलेलं साप्ताहिक कधी राजकीय मुखपत्र बनलं, हे त्याच्या मूळ संपादकांना आणि वाचकांना देखील कळलं नाही. ‘मार्मिक’ नावाच्या या साप्ताहिकातूनच १९६६ साली शिवसेना नावाच्या संघटनेची म्हणजे एका राजकीय पक्षाची स्थापना झाली. ज्याचे पक्षप्रमुख होते बाळ केशव ठाकरे अर्थात सर्वांना ज्ञात असलेले बाळासाहेब ठाकरे.
परंतु, ‘मार्मिक’ सुरू होण्याआधीपासून देशात ‘शंकर्स वीकली’ हे व्यंगचित्र साप्ताहिक दिल्लीहून प्रकाशित होत होतं. शंकर हे तत्कालीन एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार त्याचे संपादक होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यातून उफाळून आलेला मराठी असंतोष शंकर हे कधीच समजू शकले नाहीत. त्यावेळी सुद्धा शंकर यांनी अनेकदा मराठी माणूस, मराठी मानसिकता यांना न रूचणारी व्यंगचित्रं रेखाटली आणि प्रसिद्ध केली. त्यानंतर सत्तरीमधील दशकातल्या मराठी-दाक्षिणात्य वादात शंकर यांनी केवळ दाक्षिणात्य लोकांची बाजू त्यांच्या व्यंगचित्रांतून उचलून धरली.
त्यामुळे राज्यातील मराठी माणसाच्या बाजूने शंकर यांच्या व्यंगचित्रांना प्रतिउत्तर देणं गरजेचं आहे, असं तत्कालीन प्रसिद्ध व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांना वाटू लागलं. त्या वेळी बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ अस्त्राचा पुरेपूर वापर केला. तेव्हाच त्यांनी ‘मार्मिक’मधून शंकर यांच्या व्यंगचित्रांना व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर द्यायचे. परंतु, ते करत असताना बाळासाहेबांनी कधीच शंकर यांच्या व्यंगचित्रांची भ्रष्ट नक्कल केली नाही. स्वतःच व्यंगचित्र हे स्वतंत्र, ओरिजिनल व्यंगचित्र असेल, याची बाळासाहेबांनी कायमच काळजी घेतली.
हे आहे बाळासाहेबांचं तत्कालीन एक व्यंगचित्र, जे राज ठाकरेंच्या आजच्या व्यंगचित्राची पुन्हा आठवण करून देतं. वास्तविक आजच्या समाज माध्यमांच्या आहारी जाऊन फसव्या जगात हरवलेल्या आणि ‘हॅप्पी रिपब्लिक डे’ असे फुकट उपलब्ध असणारे मेसेज एकमेकांना फुकट पाठवने म्हणजे लोकशाही असं समजणाऱ्या अनेकांना त्या व्यंगचित्रामागचं वास्तव समजणे कठीण आहे. किंबहुना स्वायतत्ता या शब्दाचा अर्थ सुद्धा समजू शकणारे संदर्भहीन प्रतिक्रिया देताना समाज माध्यमानवर रोज आढळतील.
मागील साडेचार वर्षांचा विचार केल्यास सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, पत्रकार, न्यायालयं असा अनेक महत्वपूर्ण असणाऱ्या संस्था स्वायत्तता आणि विश्वासार्हता गमावून बसल्यास आहेत. राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचं अधिकार क्षेत्र कमी करण्यात आलं आहे. हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संविधान आणि घटना संपवण्याचे काम सुरु असल्याची चर्चा रोजचाच विषय बनली आहे.
वास्तविक मनसे अध्यक्षांनी आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राचा आणि भारत माता असा कोणताही संदर्भ नव्हता आणि मग देश तर दूरच राहिला. ‘तो’ भारत असा पुल्लिंगी असणाऱ्या देशाला ‘भारतमाते’ची सुदृढ ‘स्त्री’ प्रतिमा सर्वसाधारणपणे भारतीयांच्या डोक्यात घर करून बसली आहे. त्यामुळेच कोणतेही संदर्भ कुठेही लावले जातात. अर्थात यात भाजप समर्थकांचाच भरणा अधिक होता हे सुद्धा तितकंच खरं आहे.
राज ठाकरेंच्या आजच्या व्यंगचित्रात दाखवलेली महिला हा ‘देश’ नसून ते मार्मिक शब्दात ‘संविधान’ आहे. त्यामध्ये कुठेही भारतमातेचा अपमान नसून केवळ मोदी-शहा या हुकूमशाही स्वभावाने जोडीने स्वतःची राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी “प्रजेची-सत्ता” म्हणजे प्रजेचा गळा कसा आवळला आहे, हेच राज ठाकरे यांनी दाखवले आहे. त्यावर कोणाचे काही मत असले तरी किमान हा चित्रआशय प्रेक्षकाला वाचता यायलाच हवा. जो आजच्या डिजिटल दुनियेत सर्वकाही शोधणाऱ्या पिढीला समजणे तसं थोडं अवघड आहे. सध्याच्या डिजिटल दुनियेत हरवलेल्यांना एकूणच चित्रकलेची आणि व्यंगचित्रकलेची समज कमी असल्याने लोक ‘त्या’ भाष्याला फार बाळबोधपणे आणि अति गांभीर्याने घेतात. त्यामुळेच कलेतील खरा व्यंगार्थ बाजूला पडतो आहे.
वास्तविक ज्या पक्षाचे समर्थक हे पसरवत आहेत त्यांना मोदींनी ‘योगा-डे’ला तिरंग्यासोबत जे केलं होतं, ते आठवलं असतं तर ‘रिपब्लिक-डे’ खऱ्या अर्थाने त्यांनी साजरा केला असे म्हणता आले असते. पण तसे होणे शक्य नाही कारण तेच फक्त देशात सर्वश्रेष्ठ आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं