राज ठाकरे यांनी घेतली शहीद जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट

कारंजा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून पक्ष विस्तारासोबत ते अनेक समाजसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर सुद्धा भर देत आहेत. दरम्यान, काल त्यांनी शहीद जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ढोपे कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या.
कारंजा येथील जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांचा सिमा सुरक्षा दलात मेघालय राज्यातील शिलाॅंग येथे कर्तव्य बजावत असतांना १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या भावाशी संपर्क साधून माझ्या जिवास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून धोका असल्याची माहिती दिली होती. त्यावरून कारंजा तालुक्यातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले होते. सदर प्रकरणी सिमा सुरक्षा दलातील ५ जणांवर हत्येचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. जवान सुनिल ढोपे मृत्यूप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचे आश्वासन राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले आहे.
यावेळी सुनील ढोपे यांचे बंधू ज्ञानेश्वर ढोपे यांनी घडलेला सर्व प्रकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर घातला. त्यावर या प्रकरणाची सत्यता पडताळून ढोपे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, या भेटीवेळी त्यांच्या समवेत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर आदी नेते उपस्थित होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं