देशातील हुकूमशाही ७-८ महिन्यांत संपेल: राज ठाकरे

चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलून देशातील सामान्य जनतेला फसवत आहेत, परंतु लोक हे आता खपवून घेणार नाहीत अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. सध्या राज ठाकरे के कोंकण दौऱ्यावर असून ते रत्नागिरी दाखल झाले असून त्यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होत असून त्यांनी आता साफ नीयत-सही विकास हा नवा नारा दिला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी हा दिवस म्हणजे ‘विश्वासघात दिन’ म्हणून पाळणार आहेत. राज ठाकरे कोंकण दौऱ्यावर असून ते कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या तसेच स्थानिक कोंकणी लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत.
याच दौऱ्यात अनेक पत्रकार त्यांना मोदी सरकारच्या कारभारा विषयी प्रश्न विचारात आहेत. आज मोदीसरकारला ४ वर्ष पूर्ण होत असल्याने पत्रकांनी त्यांना मोदी सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न केलं तेव्हा, ‘देशातील हुकूमशाही ७-८ महिन्यांत संपेल’ असं उत्तर दिल आहे. मोदींनी सामान्य जनतेला फसवलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता हे सर्व खपवून घेणार नाही असं राज ठाकरे म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं