निसर्ग संपन्न केरळात जे शक्य झालं, ते कोकणात अनेक वर्ष का शक्य झालं नाही? राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकणातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी कोकणातील अनेक गंभीर विषयांना हात घातला. त्यावेळी त्यांनी कोकणच्या निसर्गाचा दाखला देताना केरळ राज्यातील पर्यटनाच उदाहरण समोर ठेवलं. जर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढीस लागलं, मग कोकणच्या निसर्गात अशी काय कमी होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
केरळ राज्य जितकं निसर्ग संपन्न आहे तेवढीच कोकण भूमी सुद्धा निसर्ग संपन्न असून इथे त्यांच्या इतके पर्यटन का वाढीस आलं नाही. कारण कोकणाबद्दल तसा विचारच करण्यात आला नाही आणि त्यामुळेच केरळात जे शक्य झालं ते कोकणात आजही शक्य झालं नाही. अॅमेझॉननंतर कोकणच्या सह्याद्री पर्वतरांगेत सर्वात मोठी जैवविविधता आहे. त्यामुळे त्याच महत्त्व सामाजिक संस्थांनाही कळू लागल्याने, त्यांनी या संदर्भात सखोल अभ्यास सुरु केला आहे. पण दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांनी कोकणाकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे असा घणाघात सुद्धा राज ठाकरे यांनी केला.
केवळ निसर्गाला विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे विद्यमान सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतियांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी कृपया देऊ नका, कारण तुमच्या जमिनी तुम्ही त्यांना विकल्या तर तुमची ओळखच कायमची पुसली जाईल. त्यामुळे कोकणी माणसाने सावध राहायला हवं, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
मनसे अध्यक्षांनी मेळाव्याचे भाषण सुरू करण्यापूर्वी आंबेनळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आणि कोकणातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून राज्य सरकारवर कडाडून टीका केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं