देश ‘आयसीयू’त, पण निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल: राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा मोदी सरकारच्या मागील चार साडेचार वर्षाच्या कार्यकालावर व्यंगचित्रातून टीका केली आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच्या त्यांनी भारतात काय परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्यामुळे भारत देशच सध्या आयसीयूमध्ये गेला आहे असं म्हटलं आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी टीका व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात केली आहे.
कालच राज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे समाज माध्यमांच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यातील पहिलं व्यंगचित्र त्यांनी आज धनत्रयोदशीनिमित्त रेखाटले आहे. धनत्रयोदिवशी हा दिवस देशभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. विशेष म्हणजे वैद्यकीय शास्त्राचा देव “धन्वंतरी” ह्याचा जन्मदिवस म्हणून सुद्धा काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात, असे राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात म्हटले आहे.
या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी धन्वंतरीचे चित्र सुद्धा रेखाटले आहे. यात भारत ICU मध्ये दाखवण्यात आला आहे. परंतु, धन्वंतरी ICU बाहेर एकत्र जमलेल्या सामान्य लोकांना उद्देशून सांगतात, ‘काळजीचे कारण नाही. गेल्या साडे चार वर्षात त्याच्यावर (म्हणजे भारतावर) खूप अत्याचार झाले आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर.’ राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकजण रिट्वीट सुद्धा करत आहेत.
#Diwali2018 #RTist #RajThackeray #cartoons #दिवाळी #dhanatrayodashi #India pic.twitter.com/jfDSgLJ7En
— Raj Thackeray (@RajThackeray) November 5, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं