दुष्काळग्रस्त, तहानलेला महाराष्ट्र आणि अ'संवेदनशील' सरकार: व्यंगचित्र प्रसिद्ध

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाने निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर वास्तव मांडताना आजारी साखर कारखाने आणि त्यांना राज्य सरकारकडून देऊ केलेली आर्थिक मदत यावर भाष्य केले आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात नोव्हेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाई सुरु झाली आहे. असं असताना सुद्धा फडणवीस सरकार तहानलेल्या ग्रामीण महाराष्ट्राला मदतीचा हात पुढे करण्याऐवजी भ्रष्टाचाराने आजारी पडलेल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देत असून, साखर सम्राट आणि फडणवीस सरकारचं साटंलोटं असल्याचं व्यंगचित्रात दाखवले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात एक तहानलेला शेतकरी पाण्यासाठी फडणवीसांकडे विनंती करत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यावर ओरडत असून, त्याला थेट कोपऱ्यात जाऊन बसण्याच्या इशारा देत आहेत असं दाखविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फडणवीसांना त्यांनी संवेदनशील सरकार अशी उपमा व्यंगचित्रात दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, “वा.. जा बघू, तिथे कोपऱ्यात जाऊन बस ! सारखी आपली पिरपिर पिरपिर, पाणी द्या पाणी द्या ! याला जरा शांतपणे गिळू देशील की नाही !,” असा साखर कारखान्यांकडे इशारा करत म्हणताना व्यंगचित्रात दिसतात.
काय आहे ते नेमकं व्यंगचित्र?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं