पवार-राज भेटीची चर्चा, पण त्यांना तर सेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर सुद्धा भेटले होते

औरंगाबाद : प्रसार माध्यमांवर सध्या चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील एकाच हॉटेलातील वास्तव्याची आणि एकाच विमानाने मुंबईच्या दिशेने केलेल्या प्रवासाची. परंतु या दोन्ही नेत्यांची भेट शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सुद्धा घेतल्याचे समोर आले आहे.
विदर्भ दौऱ्यात शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट वास्तविक खुलेआम झाली आणि प्रसार माध्यम मध्ये त्याभेटीचे फोटो सुद्धा व्हायरल झाले. परंतु अजून एक फोटो समोर आला आहे आणि तो म्हणजे गुफ्तागु केवळ शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातच नाही झाली तर खुद्द शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर सुद्धा या दोन नेत्यांसोबत गुफ्तागु करून आल्याचे वृत्त आहे. त्यांच्यात नेमकी काय चर्चा रंगली ते समोर आलं नसली तरी शिवसेनेची मात्र यावरून अडचण होण्याची शक्यता आहे.
अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे मराठवाड्यातील जालनाचे आमदार तसेच राज्यमंत्री सुद्धा आहेत. राज ठाकरे आणि शरद पवार औरंगाबाद म्हणजे मराठवाड्यात असताना त्यांनी शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यांनी कोणत्या विषयावरून ती भेट घेतली त्याचा तपशील पूर्ण समजू शकला नसला तरी मनसे अध्यक्ष उपस्थित असताना शिवसेनेच्या मंत्र्याने भेटी घेतल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे हे मात्र नक्की.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं