ओबीसींचा विषय पुढे करून सगळ्या महापालिकांवर प्रशासक नेमून, त्या महापालिका सरकारच चालवणार - राज ठाकरे

पुणे, ०५ सप्टेंबर | लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, असं सांगतानाच सरकारलाच आता निवडणुका नको आहोत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
ओबीसींचा विषय पुढे करून सगळ्या महापालिकांवर प्रशासक नेमून, त्या महापालिका सरकारच चालवणार – MNS Chief Raj Thackeray talked on upcoming municipal elections in Maharashtra :
पुणे महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे तयारीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत. या महिन्यातील राज ठाकरे यांचा पुण्याचा हा 8 वा दौरा आहे. राज ठाकरे यांनी येथील 8 विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यावर सर्व पक्षांचं एकमत झालं आहे. त्यावर तुमचं मत काय?, असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.
ओबीसी राजकीय आरक्षण बाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, निश्चित स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही”.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MNS Chief Raj Thackeray talked on upcoming municipal elections in Maharashtra.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं