राज ठाकरेंची महाडच्या चवदार तळ्याला भेट : कोंकण दौरा

महाड : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे मेळावे तसेच महाराष्ट्र सैनिकांच्या भेटी साठी कोंकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान महाड मधील वास्तव्यात त्यांना चवदार तळ्याला भेट देण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी थेट चवदार तळ्याला भेट दिली जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता.
याच ठिकाणावरून सामाजिक सशक्तीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता आणि जो आजही आपण महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून ओळखतो. त्या ठिकाणाला त्यांनी पुष्पहार घालून वंदन केले आणि बराच वेळ तेथे आजूबाजूची पाहणी सुद्धा केली. त्यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आणि अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा कोंकणी वर्ग आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूका आणि त्यासाठी महत्वाचा पक्ष विस्तार लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष कोंकण दौऱ्यावर असून ते अनेक स्थानिक लोकांच्या, समाजसेवी संस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन तिथल्या मूळ समस्या समजून घेत आहेत. रत्नागिरीतील नाणार रिफायनरी संदर्भात सुद्धा राज ठाकरे यांनी याआधी नाणारला भेट देऊन तेथे प्रकल्प बाधित गावकऱ्यांना संबोधित केले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं