राज ठाकरे आझाद मैदानावर जाऊन उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची भेट घेणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी मुबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेणार आहेत. आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दुपारी १.०० वाजता ही भेट होणार असल्याचे समजते. काही दिवसांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या शिक्षकांची सुद्धा ते भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
साधारण दुपारी दीडच्या सुमारास ते मुंबईतील आझाद मैदानात दाखल होतील असे समजते आहे. त्यानंतर आज सायंकाळी ५ वाजता जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या सभागृहात रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर यांच्या चित्रांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून या कार्यक्रमाला सुद्धा राज ठाकरे विशेष उपस्थिती दर्शवतील असे वृत्त आहे.
दरम्यान, आज मुंबई आझाद मैदान येथे राज्यभरातील शेतकरी तसेच आदिवासी सुद्धा विराट मोर्चा घेऊन दाखल होत आहेत. त्यांची सुद्धा राज ठाकरे भेट घेणार का हे पाहावं लागणार आहे. सध्या राज्यभर दुष्काळाचे भीषण सावट असताना राज्यकर्ते धर्म आणि नामांतराच्या राजकारणात मूळ विषयांना बगल देत आहेत असं एकूण वातावरण आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं