मनसेने पूर्ण केलेलं खेड'वासियांच स्वप्नं शिवसेनेने पळवलं

रत्नागिरी : राजकारणाच्या आखाड्यात उमेदवार पळवा पळवी काही नवीन विषय नाही. त्यात शिवसेनेने सध्या पदवी मिळवली आहे असच म्हणावं लागेल. त्यात ते मनसे संबंधित असेल तर त्यांना अधिक आनंद होतो. मागे भाजपने मुंबईतील एक नगरसेवक पदाची पोटनिवडणूक जिंकताच भाजपच्या नेत्यांनी लगेच आमचा महापौर मुंबई महापालिकेत बसविणार अशी हूल देताच बिथरलेल्या सेनेने भाजपचे नगरसेवक फोडता येणार नाहीत हे ध्यानात येताच स्वतःची अर्थशक्ती वापरून मनसेचे ६ नगरसेवक गळाला लावून स्वतःची पाठ थोपटून घेतली, परंतु सामान्यांकडून त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या.
आता तर शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खेड तालुक्यातील शिवतर गावातील हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मारकासाठी हवाई दलाने मंजूर केलेले टीटीएल-एचपीटी ३२ हे लढाऊ विमान एका मालवाहू ट्रकने ८ जून रोजी खेडमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी मालवाहू ट्रकचालकाची दिशाभूल करून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे स्वीय सहाय्यक योगेश सदावत्रे यांनी ते थेट रामदास कदम यांच्या दंत महाविद्यालयात घेऊन जाण्याचा भीम पराक्रम केला आहे.
रत्नागिरी खेड तालुक्यातील शिवतर गावातील हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मारकासाठी हवाई दलाचे जुने विमान मिळावे अशी खेडवासीयांची प्रचंड इच्छा होती. खेडवासीयांची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी जवळजवळ ३ वर्षे सतत प्रयत्नशिल होते. तसेच त्यासाठी त्यांनी भारतीय हवाई दलाकडे अनेक पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केल्यावर भारतीय दलाने वायुसेनेच्या पूर्वीच्या वापरातील टीटीएल-एचपीटी ३२ हे हवाई दलाचे लढाऊ विमान खेड नगर परिषदेला मंजूर करून दिले.
परंतु मनसेने खेडवासियांचे पूर्ण केलेलं हे स्वप्न तसेच खेड तालुक्यातील शिवतर गावातील हुतात्म्यांच्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या स्मारकासाठी हवाई दलाने टीटीएल-एचपीटी ३२ हे लढाऊ विमान ८ जूनला मालवाहू ट्रकने पाठविले होते, तेव्हा मालवाहू ट्रकचालकाची दिशाभूल करून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे स्वीय सहाय्यक योगेश सदावत्रे यांनी ते थेट रामदास कदम यांच्या दंत महाविद्यालयात घेऊन जाण्याचा भीम पराक्रम केला.
हवाई दलाने पाठविलेले विमान हे विमान ठेवण्यासाठी आम्ही शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात ते ठेवण्यासाठी तयारीला सुद्धा लागलो होतो. पण, हवाई दलाचे ते विमान पोहोचलेच नाही. मात्र, गेल्या शुक्रवारी संरक्षण विभागाकडून विचारणा झाली. तेव्हा आम्हाला धक्काच बसला. कारण आम्ही चौकशी केली असता ते हुतात्म्यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून आलेले लढाऊ विमान शिवसनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या खासगी दंतमहाविद्यालयात पळवून नेण्यात आल्याच सर्वाना उघडकीस आला.
शिवसनेच्या नेत्यांना आपण काय पळवत आहोत याच भान सुद्धा राहील नसल्याची खेडमध्ये चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान चोरीला जाणे आणि ते राज्याच्या मंत्र्यांच्या दंतविद्यालयात आढळणं हे खूप गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे मनसेने रामदास कदम यांचे स्वीय सहाय्यक योगेश सदावत्रे यांच्याविरूध्द खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं