मुबईकरांची लूट करणाऱ्या ‘पे अॅण्ड पार्क’विरोधात मनसे आक्रमक

मुंबई : मनसे मुंबई महानगरपालिकेच्या नवीन सशुल्क वाहनतळ म्हणजे ‘‘पे अॅण्ड पार्क’ धोरणाविरोधात आक्रमक झाली आहे. तसेच शहरातील सामान्यांची लूट करणार हे धोरण लवकरच रद्द केले नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा थेट इशारा मनसेचे विभागप्रमुख विजय लिपारे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. तसेच मनसे उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करेल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई महापालिकेने ‘पे अॅण्ड पार्क’चे धोरण हे प्रथम प्रायोगिक तत्वावर ‘ए’ प्रभागात राबविले आहे. परंतु नंतर ते संपूर्ण मुंबई शहरात अंमलात आणण्याचा मुंबई पालिका प्रशासनाचा मानस आहे. मुंबई पालिका प्रशासन हेच धोरण ‘ई’ प्रभागातील भायखळा पूर्वेकडील ई.एस. पाटणवाला मार्ग, बकरी अड्डा येथील ना.म. जोशी मार्ग या ठिकाणी पे अॅण्ड पार्क सुरू येथे राबविणार आहे.
पुढे विजय लिपारे यांनी सांगितलं की, मुंबईच्या गिरणगाव परिसरात महापालिका कर्मचारी वसाहत, महापालिका शाळा व मोठ्या संख्येने चाकरमान्यांची वस्ती आहे. तसेच जुन्या बैठ्या चाळी व म्हाडाच्या इमारतींमध्ये अद्याप पार्किंगची व्यवस्थाच नाही. तर दुसरीकडे मुंबईतील टॅक्सीचालक व माल वाहतूक करणारे चालक याच मार्गांवर रात्रीच्या वेळेस पूर्वापारपासून गाड्या पार्क करत आहेत. त्यामुळे, येथील चालकांकडे या ठिकाणी गाड्या पार्क करण्यावाचून दुसरा पर्याय सुद्धा नाही.
तसेच या ठिकाणी राहणारे लोक आणि पूर्वापार गाड्या पार्क करणारे कोणी श्रीमंत नाहीत, तरी मुंबई पालिका या ठिकाणी ‘ए वर्गा’चे शुल्क आकारणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे हे नवीन पे अँड पार्कचे धोरण आणि त्यांचे शुल्क येथील सामान्य वाहनचालक व मालकांना परवडणारे नाही. त्यामुळे स्थानिक लोकांना आणि छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या चालकांना हे महागडे दार कसे परवडणार असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.
मनसे लवकरच मुंबई पालिकेच्या नव्या पे अँड पार्क धोरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असून पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील राजन शिरोडकर हा खटला न्यायालयात मांडतील असं विजय लिपारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
मुंबई पालिकेचे ई.एस. पाटणवाला मार्गाचा समावेश ‘ए वर्गा’त केला आहे आणि त्याप्रमाणे दुचाकी व चारचाकीसाठीचे नवे दार खालील प्रमाणे असतील ते सामान्यांना रोज कसे परवडतील ?
दुचाकी पार्किंग:
१. पहिल्या तासासाठी – १८ रुपये
२. १ ते ३ तास – ५३ रुपये
३. ३ ते ६ तास – ७१ रुपये
४. ६ ते १२ तास – ८९ रुपये
५. १२ तासानंतर – १०६ रुपये
६. सकाळी ८ ते रात्री ८ (महिनाभर) – १,९४७ रुपये
७. रात्री ८ ते सकाळी ८ (महिनाभर) – ९७४ रुपये
तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी
१. पहिल्या तासासाठी – ७१ रुपये
२. १ ते ३ तास – ८९ रुपये
३. ३ ते ६ तास – १२४ रुपये
४. ६ ते १२ तास – २१३ रुपये
५. १२ तासानंतर – २४८ रुपये
६. सकाळी ८ ते रात्री ८ (महिनाभर) – ४,६७३
७. रात्री ८ ते सकाळी ८ (महिनाभर) – २,३३६
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं