VIDEO - विद्यार्थी-पालकांनो नक्की ऐका; शिक्षण महत्वाचं! पण तेच आयुष्य आहे का? विचार करा!

मुंबई : सध्याची जीवघेण्या स्पर्धेमध्ये गुंतलेली शिक्षणपद्धती पालकांसोबतच विद्यार्थ्यांसाठी मोठं आवाहन ठरली आहे. याच शिक्षणपद्धतीत पालक आणि विद्यार्थी दोघेही सारखेच भरडले जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पालक आणि विद्यार्थीदेखील ताणतणावाखाली आयुष्य जगताना सहज नजरेस पडतं. परंतु, शिक्षण म्हणजेच आयुष्य आहे का? ही विचार करायला लावणारी गोष्ट आज प्रत्येक घराशी निगडित आहे.
त्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी “आता बोलायलाच हवं!” या शीर्षकाखाली एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी शिक्षणाचं आयुष्यात महत्व असल्याचं अधोरेखित करताना, केवळ शिक्षणच आयुष्य नाही हे पटवून देण्यासाठी पालक आणि विध्यार्थ्यांशी त्यांनी या व्हिडिओ मार्फत सुसंवाद साधला आहे. त्यानिमित्त त्यांनी जगातील अनेक मोठ्या उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तिमत्वांचा दाखला दिला आहे. शिक्षणाचं महत्व नक्कीच असल्याचं सांगताना शिक्षणच आयुष्य नाही हे समजावताना, पालक-विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश त्यांनी या संवादातून दिल्याचे समजते.
आता बोलायलाच हवं! या शीर्षकाखालील व्हिडिओ मध्ये नक्की काय म्हटलं आहे अभिजित पानसे यांनी?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं