कंपनी मालकांनी दिवाळीत दगा दिला, अविनाश जाधवांनी कामगारांना केलं खिशातून २५ लाख पगाराचं वाटप

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा मोठा दिलदारपणा समोर आला आहे. नवी मुंबईमधील शर्ट कंपनीच्या कामगारांना थकीत पगार दिवाळीपूर्वी मिळवून देणार असं आश्वासन अविनाश जाधव यांनी कामगारांना दिलं होतं. परंतु नेमकं दिवाळीच्या तोंडावर कंपनी मालकाने दगा दिला आणि अजून थोडा वेळ द्या असा रेटा कामगारांकडे आणि मनसेच्या शिष्टमंडळाकडे पुढे केला. परंतु मालकाच्या या वागण्यामुळे शेकडो कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचे पडलेले चेहरे उपस्थितांना जाणवत होते. कारण भर दिवाळीत पगारा अभावी रिकामा खिसा अशी कामगारांची अवस्था अविनाश जाधवांच्या नजरेस पडली आणि कामगारांनी ती कुरबुर कंपनीच्या मालकांसमोर सुद्धा व्यक्त केली.
परंतु, कामगारांना स्वतः दिलेला शब्द वाया जाऊ नये आणि या शेकडो कुटुंबीयांची दिवाळी कडू होऊ नये म्हणून अविनाश जाधव यांनी स्वतःच्या खिशातून सर्व कामगारांना २५ लाख रुपयांच्या पगाराचे वाटप केले आणि त्यानंतर कामगारांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळालं. परंतु, अविनाश जाधवांच्या या दिलदार पणाला त्या शेकडो कामगारांनी लाख मोलाचे आशीर्वाद सुद्धा दिले. विशेष म्हणजे, कामगारांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर कोणत्याही पक्षांपेक्षा मागील अनेक महिन्यापासून उजवी होताना दिसत आहे.
शर्ट कंपनीच्या मालकांनी काही कारणास्तोव पैसे देता आले नाही, परंतु कामगारांची दिवाळी तर दुःखात जाणार हे स्वीकारण्यापेक्षा त्यांनी कामगारांना स्वतःच दिलेलं वचन मोडू नये आणि कामगारांची दिवाळी खराब होऊ नये म्हणून खिशातून २५ लाख खर्च करत सर्व कामगारांना २५ लाख रुपयाचं पगार वाटप करून दिवाळीच्या शुभेच्या सुद्धा दिल्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं