२७ लाख भाडे! मराठी आजींची शिवसेनेच्या मुंबई महापालिकेकडून लुबाडणूक तर मनसे मदतीला: सविस्तर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या KEM रुग्णालयात तब्बल ३७ वर्षे सेवा करणा-या परिचारिकेने सेवानिवृत्त झाल्यानंतर, कुटुंबाला राहण्यास हक्काचे घर नसल्याने त्या पतीसोबत स्टाफ क्वाटर्समध्ये मागील ४ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. परंतु, या ४ वर्षांचे तब्बल २७ लाख रुपये इतके प्रचंड भाडे मुंबई महापालिकेने आकारल्याने या गरीब आजींना रोज रडू कोसळत आहे. तब्बल २७ लाख रूपये भाडे आकारत शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आणि रुग्णालय प्रशासन या गरीब आजींना लुबाडत आहे का ? असा सवाल मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची त्या आजींसोबत नांदगावकर यांनी भेट घेतली होती. दरम्यान, दिवाळीनंतर याबाबत योग्य दखल घेण्याचे आश्वासन महापौर महाडेश्वरांनीं दिले होते. त्यानुसार मुंबई महानगर पालिका प्रशासनाने जर योग्य पावले उचलली नाहीत तसेच २७ लाख भाडे माफ केले नाही तर आम्ही आजींना थेट महापौर बंगल्यात निवासासाठी जागा देऊ, असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.
दरम्यान, संबंधित निवृत्त परिचारिका १० बाय ३०च्या छोट्या खोलीत राहतात. विशेष म्हणजे रुग्णालयात सेवेत असताना या खोलीचे भाडे केवळ १६६ रूपये लावण्यात येत होते. दुसरं म्हणजे रुग्णांच्या उत्कृष्ट सेवेसाठी या आजींना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. परंतु, सेवानिवृत्त झाल्यानंतर मला रहायला कुठे घर नव्हते. माझे पती कॅन्सरग्रस्त होते आणि त्यांचे आकस्मित निधन झाले. मला दुसरीकडे कुठे रहायला जागा नसल्याने मी स्टाफ क्वाटर्समध्ये राहत होते. परंतु, निवृत्तीनंतर ४ वर्षे अधिक राहिले म्हणून माझ्याकडून तब्बल २७ लाख रुपये घरभाडे मागितल्याची खंत या परिचारिकेने व्यक्त केली. या प्रकरणात रुग्णालयाचे अधिष्ठाता, मुंबईचे महापौर यांचीही भेट घेतली असली तरी काही सुद्धा हालचाल झाली नसल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबई महानगरपालिकेने या आजींवर एवढे भाडे का आकारले? याचा जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेने विचारणारच आणि या आजींना न्याय मिळवून देणारच अशी आक्रमक भूमिका नांदगावकर यांनी घेतली आहे. तसेच हा संपूर्ण प्रकार अतिशय संतप्त करणारा आहे. इथे करोडो रूपयांची थकबाकी ठेवणाऱ्या आमदार-खासदारांवर कोणतीही कारवाई न करता एका गरीब आजीला जिने मुंबई महानगर पालिकेत रुग्णांची सेवा केली आहे, त्यांना प्रचंड लाखोंचे घरभाडे कसे लावता? असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं